बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी मार्गावरील बोकनुर क्रॉसवर झालेल्या अपघातात युवा लष्करी जवानाचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री झाला. 22 वर्षीय ओमकार महादेव हिंडलगेकर असे ठार झालेल्या युवकाचे नाव असे आहे.

जवान ओमकार हिंडलगेकर हा कारमधून बेळगुंदीकडे येत होता. बोकनूर क्रॉस येथे त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने झाडाला धडक दिली. त्यामध्ये तो ठार झाला. तो नुकताच भारतीय सैन्यात जवान पदावर भरती झाला होता असे समजते. अपघाताचा अधिक तपशील मिळवायचा आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद करून तपास चालविला आहे.


Recent Comments