Belagavi

बेळगुंदीजवळ अपघातात लष्करी जवानाचा मृत्यू

Share

बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी मार्गावरील बोकनुर क्रॉसवर झालेल्या अपघातात युवा लष्करी जवानाचा मृत्यू  झाला. हा अपघात सोमवारी रात्री झाला. 22 वर्षीय ओमकार महादेव हिंडलगेकर असे ठार झालेल्या युवकाचे नाव असे आहे.

जवान ओमकार हिंडलगेकर हा कारमधून बेळगुंदीकडे येत होता. बोकनूर क्रॉस येथे त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने झाडाला धडक दिली. त्यामध्ये तो ठार झाला. देशसेवा करण्याच्या हेतूने तो नुकताच भारतीय सैन्यात जवान पदावर भरती झाला होता.

काही दिवस सुटी घेऊन तो गावी आला होता. त्याचवेळी दुर्दैवाने हा अपघात झाला. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद करून तपास चालविला आहे. आज दुपारी उत्तरीय तपासणीनंतर जवान ओंकारचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर बेळगावातील मराठा इन्फन्ट्रीच्या जवानांच्या उपस्थितीत ओंकारची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

 

गावच्या स्मशानभूमीत कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी जवान ओंकार हिंडलगेकर यांना एमएलआयआरसीच्या जवानांनी शोकधून वाजवून सलामी देऊन अखेरची मानवंदना दिली. भर पावसाची तमा न करता ओंकारच्या अंत्यविधीसाठी अपार जनसमुदाय लोटला होता.

Tags: