खानापूर तालुक्यातील जिल्हा आणि तालुका पंचायत मतदार संघांची पुनर्र्चना करण्यात यावी अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कचेरी आणि इतर नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

खानापूर तालुका भौगोलिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येमुळे येथील प्रशासकीय दृष्टिकोनातून तसेच तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून येथील ८ जिल्हा पंचायत आणि २७ तालुका पंचायत मतदारसंघांची पुनर्र्चना करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कचेरी यांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील भाजप नेत्यांनी केली करत विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर कागेरी हेगडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्याच्या भौगोलिक दृष्टिकोनातून तसेच पश्चिम घाटासह इतर तालुक्यातील निकषांचा विचार करून पुनर्र्चना करण्यात यावी. खानापूर तालुक्यात सध्या असलेली मतदार संघांची रचना हि भौगोलिक दृष्टिकोनातून अवजिंद्यानीक आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. यामुळे प्रत्येक गावाचा विकास योग्य पद्धतीने होत नसल्याचे निदर्शनात येत आहे. नागरिकांना न्याय मिळावा, तालुक्याचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून पुनर्र्चना करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्य तसेच भाजप नेते बाबुराव देसाई, कर्नाटक अरण्य विकास मंडळाचे संचालक सुरेश देसाई, मारुती पाटील, अशोक देसाई आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments