Khanapur

आमटे गावातील विद्यार्थ्यांना बससुविधा उपलब्ध करा : पंडित ओगले

Share

खानापूर तालुक्यातील आमटे गावात सुमारे ८० विद्यार्थी खानापूरला शिक्षणासाठी येतात. गेल्या १५ दिवसांपासून हे विद्यार्थी बस सेवेपासून वंचित आहेत. हि बाब लक्षात घेऊन भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी बससुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

खानापूर तालुक्यात शिक्षणासाठी आमटे गावातून येणाऱ्या ८० विद्यार्थ्यांचे बस विना हाल होत आहेत. शाळा महाविद्यालयात येण्यासाठी बससुविधाच उपलबध नसल्याने विद्यार्थ्यांना खाजगी वाहने, दुधाची वाहने अशा पद्धतीच्या विविध वाहनांच्या आधारे खानापूर गाठावे लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून बंद असलेल्या बसमुळे विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरत आहे. हि बाब लक्षात घेऊन खानापूर येथील भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी खानापूर बस डेपो मॅनेजर यांची भेट घेऊन सदर समस्या निदर्शनास आणून दिली आहे.

सदर विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आमटे गावात बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पंडित ओगले यांनी खानापूर बस डेपो मॅनेजर यांच्या कडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन देखील डेपो मॅनेजरकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना पंडित ओगले म्हणाले, गेल्या १५ दिवसांपासून बससुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. बस सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण झाली आहे. सदर बाब आपल्या निदर्शनात आल्यानंतर आपण आमटे ग्रामपंचायतीच्या वतीने खानापूर बस डेपो मॅनेजर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्या गावासाठी कायमस्वरूपी बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ()

हे निवेदन सादर करताना ग्रामस्थ आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते. गावच्या समस्यांसंदर्भात पंडित ओगले यांच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचे डेपो मॅनेजरने कौतुक देखील केले.

Tags: