संततधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली असून, अति जोखीम असलेल्या भागात प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या सूचना आ. अंजली निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

होय, आमदार अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील संभाव्य पूर परिस्थितीच्या व्यवस्थापनाबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. खानापूर तालुका हा जास्त पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने या भागातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक गावे जलमय होऊन संपर्क तुटला आहे. अशा भागातील लोक, पशुधन व मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून अशा लोकांना योग्य ती मदत आणि आपत्कालीन निवारा देण्यासाठी कार्यवाही करावी. पूर आल्यास कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पक्षाच्या किंवा खासगी व्यक्तींना प्राधान्य देऊ नये.
व्हॉट्स अप ग्रुपवर चित्रण करण्यापेक्षा तेथील परिस्थिती वेगळी असल्याने तहसीलदार आणि पोलिस विभागाने त्यानुसार एनडीआरएफच्या टीमला परवानगी द्यावी, अशा कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पावसामुळे शाळांच्या इमारती कोसळण्याची मालिका तालुक्यात सुरु असल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन प्रकरणी योग्य अहवाल द्या, असे त्यांनी सांगितले.
गेल्यावेळी अनेक भागात महापुरामुळे नुकसान झालेल्यांना अद्यापही भरपाई मिळाली नसल्याबाबत आमदार अंजली निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावर अनेकांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यांशी लिंक केले नाही, त्यामुळे भरपाई देण्यास विलंब होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी तहसीलदार प्रवीण जैन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments