बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक ते पार्वती नगर या मार्गावरील बससेवा खंडित झाली होती. हि बससेवा आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक ते पार्वती नगरया मार्गावरील बससेवा काही कारणामुळे ठप्प झाली होती. आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक ते पार्वती नगर या मार्गासाठी बससुविधा पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. मंगळवारी सदर बससेवा पूर्ववत करण्यात आल्याने राणी चन्नम्मा नगर येथील रहिवाशांनी बसची पूजा करून समाधान व्यक्त केले. कोरोना काळात बंद करण्यात आलेली हि सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याने येथील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. 
यासंदर्भात स्थानिक रहिवासी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून, कोरोना काळापासून या मार्गावरील बससुविधा बंद करण्यात आली होती. आमदार अभय पाटील यांच्या प्रयत्नातून हि सुविधा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. काही कारणास्तव बंद झालेली हि सुविधा पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून आमदार अभय पाटील आणि नंदकुमार लमाणी यांचे येथील रहिवाशांनी आभार मानले.()
यावेळी नंदकुमार लमाणी, व्ही जे देशपांडे, एस कुलकर्णी, एम एस देसाई, पवार सर, सुरेश अरळीकट्टी, पूजा लमाणी, वर्ष कुलकर्णी, स्नेहा बागेवाडी आदींसह या परिसरातील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments