पाठयपुस्तकातील मजकुरासंदर्भात झालेला वाद हा सर्वश्रुत आहे. अनेक विषयांवरून पाठ्यपुस्तकासंदर्भात वाद सुरु आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आली असून आझादीका अमृत महोत्सव अंतर्गत शासन अनेक उपक्रम देखील हाती घेत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी पाठ्यपुस्तकात इंचगेरी मठाच्या क्रांतियोगी महादेव यांच्यासंदर्भात मजकूर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या इंचगेरी येथील क्रांती योगी महादेव यांचा इतिहास मोठा आहे. हजारो देशभक्तांना स्वातंत्र्य चळवळीत समाविष्ट करणाऱ्या क्रांतियोगी महादेव यांच्यावरील अभ्यासक्रम मुलांना शिकविण्यात यावा असा आग्रह आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आहे. स्वातंत्र्यासाठी बंदुकीचा कारखाना स्थापन करणारे क्रांतियोगी महादेव यांनी स्वातंत्र्य चळवळीत २० हजार देशभक्तांसहित आंदोलन केले. ब्रिटिशांना हादरविण्यासाठी २ बंदूक कारखान्यांची स्थापना केली. या कारखान्याच्या माध्यमातून सशस्त्र सैनिकांची चळवळ उभी केली. गोवा मुक्तीसाठी पणजीत पोर्तुगीज कार्यालयावर भारतीय तिरंगा फडकवला.
कर्नाटक एकीकरण, म्हैसूर कर्नाटकात समाविष्ट करण्यात यावे या मागण्यांसाठी उपोषण केले. स्वातंत्र्य चळवळीत क्रांतियोगी महादेव यांनी केलेल्या संघर्षाचा इतिहास मुलांना समजावा यासाठी अभ्यासक्रमात त्यांचा इतिहास समाविष्ट करण्यात यावा, अशी इच्छा इंचगेरी मठाच्या सुमारे २ कोटी भक्तांनी व्यक्त केली आहे. यासोबतच विजापूर – हुबळी – धारवाड, बेळगाव, बागलकोट, गदग यासह उत्तर कर्नाटकातील देशभक्तांच्या इतिहास देखील समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 
इंचगेरी मठाच्या माधवानंद प्रभुंना मुरुरोडू महादेवाप्पा, हुबळी महादेवाप्पा असे संबोधले जाते. १९२९ मध्ये तरुण वयात महादेव यांनी ब्रिटिशांविरोधात अनेक देशभक्तांसहित लढा दिला. हुलकोटी, सावळगी, इंचगेरी पोलीस स्थानकाला घेराव घातला. पोस्ट ऑफिससह अनेक कार्यालयांना आग लावण्यात आली. ब्रिटिशांचे दळणवळणाचे साधन असणारी रेल्वे उखडून टाकण्यात आली. यासाठी सुमारे २७ वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्याशी जवळचे संबंध असणाऱ्या क्रांतियोगी यांनी हुबळी येथील किम्स हॉस्पिटलजवळील गिरीशा आश्रमात स्वातंत्र्यलढ्याबाबत घेतलेल्या गुप्त बैठकीला उपस्थिती दर्शविली. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या इंचगेरी येथील क्रांती योगी महादेव यांचा इतिहास मोठा आहे. हजारो देशभक्तांना स्वातंत्र्य चळवळीत समाविष्ट करणाऱ्या क्रांतियोगी महादेव यांच्यावरील अभ्यासक्रम मुलांना शिकविण्यात यावा असा आग्रह आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आहे.
महात्मा गांधींचे नातून अरुण गांधी यांनीही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील माधवानंदांचे योगदान आणि मठाच्या भूमिकेबद्दल “द इम्प्रिंट” या परदेशी इंग्रजी वृत्तपत्रात लिहिले आहे. इतकेच नव्हे तर मठात २५ हजारांहून अधिक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह पार पाडले. आपल्या नातवंडांचे मुस्लिमांशी लग्न लावून त्यांना धर्मनिरपेक्षतेचे धडे दिले हा आज इतिहास आहे. अशा लोकांचा जीवनसंघर्ष मुलांसाठी धडा ठरावा, हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments