ग्रामीण भागातील ओला आणि सुका कचरा उचलणाऱ्या वाहनांवर महिला कर्मचारी वाहन चालक म्हणून कार्यरत राहणार आहेत. या महिला चालकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही यांनी चालना दिली.
जिल्हा पंचायत, संजीवनी डे – एनआरएलएम, स्वच्छ भारत मिशन योजना आणि कॅनरा बँक ग्रामीण स्व उद्योग प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत कचरा उचलणाऱ्या वाहनावर चालक म्हणून महिला चालक कार्यरत राहणार आहेत. यासाठी स्व साहाय्य संघाच्या महिला सदस्यांना वाहन चालविण्याच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जिल्हा पंचायत सीईओ दर्शन सी व्ही यांनी चालना दिली.
बेळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत व्याप्तीतील ग्रामीण भागात स्वसहाय संघाच्या महिला सदस्यांसाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या टप्प्यात संघातील ३५ महिला सदस्यांनी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रत्येक ग्राम पंचायतीत ५०० महिलांना हे प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बोलताना जिल्हा पंचायत सीईओ दर्शन यांनी सांगितले कि, ग्रामीण भागातील स्व साहाय्य संघाच्या महिलांसाठी हे प्रशिक्षण सुवर्णसंधी आहे. मोफत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सदर महिलांना ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा गाडीवर वाहन चालक म्हणून भरती करून घेण्याची संधी देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ स्व साहाय्य संघाच्या महिलांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी जिल्हा पंचायत योजना संचालक रवी बंगारेप्पाणावर, कॅनरा बँक ग्रामीण स्व रोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक, जिल्हा आणि तालुका पंचायतीचे संजीवनी डे एनआरएलएम, स्वच्छ भारत मिशन योजनाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments