जीवनातील आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना केला तरच विद्यार्थी जीवनात यश संपादन करणे शक्य आहे असे केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव तालुक्यातील भुतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण व अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप केल्यानंतर बोलताना आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणे हा चांगला उपक्रम आहे. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना लॅपटॉपची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी लॅपटॉपचा वापर करावा. कोणतेही सरकार फार मोठ्या प्रमाणात सुविधा देत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शासनाच्या सुविधा मिळवून त्यांचा योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे आज आपण शिक्षण घेऊ शकत आहोत. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे विचार जाणून घेऊन त्यांचे पालन करण्याचा सल्ला सतीश जारकीहोळी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रा. एम. रामचंद्र गौडा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, समाज कल्याण खात्याच्या सहसंचालिका डॉ. उमा सालीगौडर, मूल्यमापन विभागाचे कुलसचिव प्रा.शिवानंद गोरनाळ, विद्यापीठाचे वित्त अधिकारी प्रा.डी.एन.पाटील, विद्यापीठाच्या डॉ. बी. आर. आंबेडकर अध्यासनाचे संयोजक डॉ. गजानन नायक, विद्यापीठाच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे विशेष अधिकारी डॉ. प्रा. चंद्रकांत वाघमारे व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते.


Recent Comments