Chikkodi

निपाणी तालुक्यातील माणकापुरात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Share

विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली.

अर्चना गजानन बाळशेट्टी या 35 वर्षीय विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्यातील माणकापूर गावात घडली. विहिरीवरील मोटारपंप संचाला स्पर्श झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अर्चनाला इचलकरंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र तपासणीअंती अर्चना मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे अर्चनाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत अर्चनाच्या मागे  पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Tags: