Belagavi

‘हेचि दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा’, आषाढीनिमित्त विठुरायाला बेळगावकरांचे साकडे !

Share

हेचि दान दे गा देवा, तुझा विसर व्हावाअशी आर्त साद घालत बेळगावातील विठ्ठलभक्तांनी विठ्ठल मंदिरात आज आषाढी एकादशी साजरी केली. शहापूरातील विठ्ठलदेव गल्लीतील नामदेव श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिरात आज भक्तिभावाने श्री विठूरायाची पूजाप्रार्थना करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.

विठ्ठलदेव गल्ली, शहापूर येथील नामदेव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज आषाढीनिमित्त विठ्ठल-रखुमाईची विशेष पूजा बांधण्यात आली. पुजाऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक, जलाभिषेक करून पुष्पहार आणि फुलांनी सालंकृत पूजा केली. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

यानिमित्त माहिती देताना एका विठ्ठलभक्ताने सांगितले की, आमचे आई-वडील माळकरी विठ्ठलभक्त आहेत. दरवर्षी ते आषाढीला पंढरपूरला वारीने जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. आम्ही कुटुंबीय बेळगावातच येथे येऊन दर्शन घेऊन आषाढी साजरी करतो.

दरम्यान, विठ्ठलदेव गल्ली, शहापूरातील या मंदिरात शहापूर, होसूर, खासबाग, वडगाव आदी अनेक ठिकाणच्या भाविकांनी रविवारी दिवसभर मंदिरात हजेरी लावून दर्शन घेतले.

Tags: