Chikkodi

मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडून अनुष्काच्या पालकांचे सांत्वन

Share

निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी गावात प्राथमिक शाळेच्या शौचालयात विजेचा धक्का लागून अनुष्का नावाच्या वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. मंत्री शशिकला जोल्ले यांनी अनुष्काच्या कुटुंबाची भेट घेऊन पालकांचे सांत्वन केले.

ढोणेवाडी गावातील अनुष्का बेंडे या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री शशिकला जोल्ले यांनी हेस्कॉम आणि शिक्षण विभागासह अनुष्काच्या कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याशिवाय मंत्री शशिकला जोल्ले यांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणी हेस्कॉम आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. याप्रकरणी दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असा कडक इशारा मंत्री जोल्ले यांनी अधिकाऱ्यांना दिला.

यावेळी मयत अनुष्काच्या आई-वडिलांनी मंत्री शशिकला जोल्ले यांच्यासमोर अश्रू ढाळले आणि आमच्या मुलीच्या मृत्यूबद्दल आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी मंत्री जोल्ले यांनी त्यांचे सांत्वन केले आणि सरकारकडून 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आश्वासन दिले.

Tags: