रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती ग्रामदैवत श्री सुगंधा देवीच्या मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी देवीचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना काल घडली.

मंदिराचा दरवाजा तोडून देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्यात आले. पुजारी कल्लाप्पा गुरव सकाळी मंदिरात पूजेसाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. यानंतर मंदिर समितीने रायबाग पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्वरित तपास करून चोरट्यांना शोधून काढून शिक्षा द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली.
या प्रकरणी रायबाग पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Recent Comments