आषाढी एकादशीनिमित्त बेळगावातील वडगावमधील विठ्ठल-रखुमाई मंदिरात रविवारी विशेष पूजाविधी पार पडला.
पहाटेपासूनच भाविकांनी विठ्ठल-रखुमाई मंदिरात येऊन भक्तीभावाने विशेष पूजा केली. यावेळी मंदिरात सुंदर रांगोळ्या काढून त्या फुलांनी सजवण्यात आल्या होत्या. यावेळी भाविकांनी शिस्तबद्धरितीने रांगेत थांबून आषाढ एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन धन्यता मानली.

दरम्यान, बेळगावातील केळकर बागेतील दत्त मंदिरात आषाढी निमित्त श्री दत्तांची विठ्ठल-रुक्मिणी स्वरूपात विशेष पूजा करण्यात आली. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची विशेष सजावट करून तुळशीहाराने पूजा करण्यात आली. यावेळी भर पावसातही भाविकांनी देवाचे दर्शन घेतले.


Recent Comments