बेळगावात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या नूतन पदाधिकार्यांचा अधिकारग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या नूतन पदाधिकार्यांचा अधिकारग्रहण सोहळा क्लब रोड, बेळगाव येथील इफा हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी प्रांतपाल रोटेरियन निसार बोरसदवाला, सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन डॉ. राहुल साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी 2022-23 साठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्ष म्हणून रोटेरियन आशा पाटील, सचिव म्हणून डॉ. स्फुर्ती मास्तीहोळी, खजिनदार म्हणून रेश्मा जितूर यांनी तसेच अन्य नवीन पदाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारला.



Recent Comments