बेळगावातील केएलएस संस्थेच्या आयएमईआरतर्फे भारत सरकारच्या वनविभागाच्या बेळगाव विभागाच्या सहकार्याने केएलएस आयएमईआर कॅम्पसमध्ये पर्यावरण संवर्धन आणि हरित छत वाढवण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगावचे क्षेत्रीय वन संरक्षणाधिकारी शिवानंद मगदूम यांनी कर्मचारी व विद्यार्थ्यांना संबोधित करताना पर्यावरण अधिक निरोगी, स्वच्छ करण्यासाठी वनविभाग विविध योजना व प्रकल्प कसे राबवित आहे हे सांगितले.
डॉ.संजय देशपांडे यांनी, भारताला उत्तम मानवी जीवनासाठी हरितक्रांती घडवून आणण्यासाठी वनांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला, ते पुढे म्हणाले की, वने ही पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा खजिना आहे. केएलएस आयएमईआरचे संचालन समितीचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक यांनी, अध्यक्षीय भाषणात आपले जंगल आपले राष्ट्र निर्माण करण्यात कशी मदत करेल हे स्पष्ट केले. कर्मचारी, विद्यार्थी व वनविभागाच्या सहकार्याने 20 हून अधिक प्रकारची रोपे लावण्यात आली. डॉ. आरिफ यांनी स्वागत केले. शारीरिक शिक्षण संचालक जॉर्ज रॉड्रिग्स यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 


Recent Comments