Belagavi

काँग्रेस समाजमाध्यम विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी शशिगौड निर्वाणी

Share

काँग्रेस समाजमाध्यम विभागाच्या बेळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी शशिगौड अनिल निर्वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या आदेशावरून शशिगौड अनिल निर्वाणी यांची सोशल मीडिया  बेळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याचा राज्य सचिव आणि काँग्रेस सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष  बी. आर. नायडू यांनी आदेश जारी केला आहे.

यावेळी बोलताना शशिगौडा निवाणी म्हणाले की, बेळगाव जिल्हास्तरावर आजवर काम करत असताना वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेले सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मला उच्च पातळीवर काम करण्यास मदत करत असून ही पदोन्नती आ.साठी आनंददायी आहे.

Tags: