Belagavi

हिंडाल्कोच्या पंप हाऊसमध्ये 27 पिल्लांसह दिसली विषारी घोणस

Share

बेळगाव येथील हिंडाल्को कंपनीच्या पंप हाऊसच्या भिंतीत तब्बल 27 पिल्लांसह एक विषारी घोणस साप आढळून आला.

बेळगाव शहराजवळील हिंडाल्को कंपनीच्या पंप हाऊसच्या भिंतीवर काल, शुक्रवारी एक विषारी घोणस सापाची मादी तिच्या पिल्लांसह 27 दिसली. येथील कर्मचारी शाहीद यांनी तातडीने ही माहिती प्राणी बचाव संस्थेचे विनायक केसरकर यांना दिली. घटनास्थळी धावलेल्या विनायक केसरकर आणि कलीमुद्दीन शहा यांनी आधी मादी सापाला पकडले. नंतर भिंतीत 27 पिल्ले आणि 3 अंडी सापडली.

घोणस साप अत्यंत विषारी असल्याचे सांगितले जाते. सर्पमित्र विनायक केसरकर यांनी 2 तास अथक प्रयत्न  करून सापांना सुखरूप पकडले. त्यानंतर मादी व पिल्लाना नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यांनी याबाबत इन न्यूज आपली मराठीला अधिक माहिती दिली.

अशा सरपटणाऱ्या प्राण्यांना मारून न टाकता त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे, असा सल्ला प्राणी बचाव संस्थेने दिला आहे.

Tags: