Belagavi

विठ्ठल अन वारकऱ्याची आषाढी निमित्त रांगोळी

Share

बेळगावचे रांगोळी कलाकार फोटोग्राफर अजित महादेव औरवाडकर यांनीश्री विठ्ठल वारकरी भक्त‘ 2 फूट बाय 3 फूट आकाराची रांगोळी रेखाटली आहे.

गेली 2 वर्ष झाली कोरोनाच्या महासंकटामुळे आषाढी एकादशी वारी होऊ शकली नव्हती. त्यामुळे वारकरी संप्रदायाला विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागली आहे. यातूनच बेळगावचे रांगोळी कलाकार फोटोग्राफर अजित महादेव औरवाडकर यांनी ‘श्री विठ्ठल व वारकरी भक्त’-पंढरपूरची वारी-भेटी लागी जीवा ही आस दर्शवणारी 2 फूट बाय 3 फूट आकाराची रांगोळी रेखाटली आहे.

बेळगावचे रांगोळी कलाकार, फोटोग्राफर अजित महादेव औरवाडकर यांनी ज्योती फोटो स्टुडिओ, वडगाव येथे ही अनोखी रांगोळी रेखाटली आहे. वारकरी, भक्त व नागरिकांना रांगोळी प्रदर्शन पहाण्यासाठी दि. 15 जुलै पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 8 पर्यंत खुली आहे. रांगोळीसाठी लेक कलेचा वापर करण्यात आले आहे. ही रांगोळी रेखाटसाठी औरवाडकर यांना 11 तासांचा वेळ लागला आहे.

Tags: