Belagavi

कुकडोळीत व्यायाम शाळेची स्लॅब भरणी

Share

कुकडोळी हे गाव भाजप बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने दत्तक घेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांसाठी राज्यसभा सदश्य इरण्णा कडाडी यांच्या 10 लाख रू. अनुदानातून बांधण्यात येणाऱ्या व्यायाम शाळेचा स्लॅब भरणी कार्यक्रम भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी बोलताना जाधव म्हणाले, भाजप बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने संघटनेच्या कामाबरोबरच विकास कामे सुद्धा सुरू आहेत अनेक गावामधे व्यायाम शाळा, हाय मास्ट, ग्रंथालय, रस्ते, मंदिरं आदींची निर्मिती केली जात आहे. CSC सेंटर च्या माध्यमातुन जनतेला  अवश्यक सरकारी कागदपत्रे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पुरविल्या जात आहेत असे ते म्हणाले. या प्रसंगी भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, कार्यालय चिटणीस नारायण पाटील, सिद्दप्पा हुकेरी व ग्रामस्थ उपस्थित होते

Tags: