Accident

होन्निहाळजवळ भीषण अपघातात युवकाचे दोन्ही पाय निकामी : youth lost both his legs in a tragic accident near Honnihal

Share

बेळगावबागलकोट मार्गावरील बाळेकुंद्रीहोन्निहाळ गावांदरम्यान झालेल्या अपघातात एका व्यक्तीचे दोन्ही पाय पूर्णपणे निकामी झाले.

बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गावरील बाळेकुंद्री-होन्निहाळ गावांदरम्यान हा भीषण अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेला युवक माविनकट्टी गावचा रहिवासी आहे. ३५ वर्षीय महांतेश सनदी असे त्याचे नाव आहे. त्याचे दोन्ही पाय अपघातात निकामी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महांतेशला उपचारासाठी ऍम्बुलन्समधून बेळगाव जिल्हा इस्पितळात पाठवून दिले. अपघाताचा सविस्तर तपशील अजून मिळावयाचा आहे. मारिहाळ पोलीस तपास करत आहेत.

Tags: