भरधाव कारने धडक दिल्याने कचरा गोळा करणारी पौरकार्मिक महिला जागीच ठार झाली. हा अपघात बेळगावातील संगोळ्ळी रायण्णा चौकाजवळील एलआयसी ऑफिससमोर आज शुक्रवारी सकाळी झाला.

बेळगावातील संगोळ्ळी रायण्णा चौकाजवळील एलआयसी ऑफिससमोर आज शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. कचरा गोळा करणाऱ्या महिलेला भरधाव कारने ठोकरल्याने ती जागीच ठार झाली.
52 वर्षीय अनिता राजेश बन्स असे मृत महिलेचे नाव असून ती टिळकवाडीतील पीके क्वार्टर्स येथे रहात होती. अनिता या पौरकार्मीक होत्या. नेहमीप्रमाणे त्या एलआयसी ऑफिससमोरील कचरा गोळा करत असताना एलआयसी ऑफिस आवारातून चालक गुरुराज कुलकर्णी भरधाव वेगाने कार बाहेर घेत असताना कारची धडक अनिता यांना बसली. त्यात त्या खाली पडून जागीच ठार झाल्या.
अपघातानंतर अनिता यांच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी कारचालक गुरुराज कुलकर्णी याची चांगलीच धुलाई केली. यावेळी तेथे पोलीस उपस्थित होते. मात्र नागरिकांचा संताप पाहून ते चालकाला वाचविण्यास धजावले नाहीत. वाहतूक दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळाच्या शवागारात पाठवून दिला.
दरम्यान, कार चालकाची धुलाई होत असताना तेथील २ पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments