Belagavi

बेळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असो.चा मेळावा यशस्वी : BELGAUM MOTOR DRIVING SCHOOL OWNERS ASSN MEET HELD

Share

बेळगाव जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावातील नेहरू नगर येथील बसवण्णा मंदिर कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्याचे उद्घाटन संघटनेचे राज्याध्यक्ष आनंद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर यावेळी परिषदेत विविध तालुक्यातून आलेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालकांनी आपल्या समस्या नेत्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर बोलताना जिल्हाध्यक्ष बसवराज कडली म्हणाले की, आमच्या ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकांना आगामी काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. सरकार नवनवीन नियम बनवत आहे. त्यामुळे अशा आव्हानांना आपण सर्वांनी मिळून सामोरे जावे लागेल. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या कर्नाटक राज्यातील आमच्या समस्या राजाध्यध्यक्षांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. अनेक ड्रायव्हिंग स्कूल्सना आरटीओ कार्यालयात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर प्रश्न उपस्थित करण्याचे काम आपल्याला करावे लागेल असे ते म्हणाले. यानंतर संघटनेचे सचिव नागराज एच. सी. म्हणाले, मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालकांच्या समस्यांबाबत सरकारसमोर आवाज उठवण्यासाठी आम्ही ही संघटना स्थापन केली आहे. तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्या आमच्या निदर्शनास आणा आणि आम्ही त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. बाईट यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष आनंद पाटील म्हणाले, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना वाहतुकीचे नियम नीट शिकवले पाहिजेत. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही अधिकार्‍यांकडून त्रास होत असेल, तर वरिष्ठ अधिकार्‍यांकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यास घाबरू नका. तेथेही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्याकडे या, आम्ही बंगळुरू येथील वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून समस्या सोडविण्याचे काम करू. बेळगावची मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशन संपूर्ण राज्यात उत्तम काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.  यावेळी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष बसवराज हानगल, बेळगाव संघटनेचे उपाध्यक्ष एजाज अहमद तोरगल, महादेव मुन्नोळीकर, बसवराज हुडेद, विश्वनाथ मेटगुड्ड, ओमप्रकाश पाटील, अनिल जंगमशेट्टी, सुनील मेत्री, एस. एस. ठक्कनवर आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: