Belagavi

‘अभंगरंग’च्या भक्तिरसात रसिक श्रोते चिंब

Share

बेळगावात काल संध्याकाळी ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकरटिकेकर आणि मंजुषा पाटील यांच्याअभंगरंग‘  या बहारदार संगीत कार्यक्रमात रसिक श्रोते भक्तिरसात चिंब झाले

ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि मंजुषा पाटील यांचा अभंगरंग संगीत संध्या कार्यक्रम बेळगावच्या लोकमान्य रंगमंदिरात काल संध्याकाळी रसिकांच्या अमाप प्रतिसादात पार पडला.

उद्योजक विजयराव पुसाळकर यांचे वडील बाबुराव पुसाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य सोसायटीच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, डी.व्ही. काणेबुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष गोविंद बेडेकर, उद्योजक विजय आणि शंतनू पुसाळकर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टीकेकर आणि मंजुषा पाटील यांनी विठ्ठलाचे विविध अभंग सादर केले. अभंग, गवळण, जोहर आदी रचना त्यांनी सादर केल्या. रामकृष्ण हरी या रचनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर आरती अंकलीकर-टीकेकर आणि मंजुषा पाटील यांनी, श्रीमन नारायण श्रीपाद शरण, पाहावा नयनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, या पंढरीचे सुख पाहता डोळा, श्रीरंगा कमलाकांता, बोलावं विठ्ठल, पहावा विठ्ठल आदी अभंग रचना सादर करून उपस्थितांना स्वरांच्या सरींनी चिंब केले.

त्यानंतर आरती अंकलीकर-टीकेकर आणि मंजुषा पाटील यांचा सत्कार वीणा संत, वादक शिक्षा, सरगम चन्नाळ. अनुराधा मांडलिक, रसिका पैठणकरा, अनुष्का साने आणि ध्वनी संयोजक गुरू पेडणेकर यांचा उद्योजक राम भंडारे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. निहारिका पुसाळकर यांनी आभार मानले.

 

 

 

Tags: