Chikkodi

विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी ढोणेवाडी शाळेचे मुख्याध्यापक निलंबित

Share

निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी प्राथमिक शाळेतील शौचालयात विजेचा धक्का लागून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्याध्यापक कुमार नाटेकर याना शिक्षण खात्याने निलंबित केले आहे.

होय, ढोणेवाडी सरकारी प्राथमिक शाळेतील तिसरीची ९ वर्षांची विद्यार्थिनी अनुष्का बेंडे शाळेतील शौचालयात गेली असता विजेचा धक्का लागून जागीच मरण पावली होती. याप्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून मुख्याध्यापक कुमार नाटेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. चिक्कोडी डीडीपीआय मोहन हंजाटे यांनी हा आदेश बजावला आहे. अनुष्काच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाईच्या मागणीसाठी ढोणेवाडी ग्रामस्थांनी नुकतीच निदर्शने केली होती.

त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, टेलिफोनच्या खांबावरून वीजपुरवठा देण्यात आल्याने ही दुर्घटना घडली असताना हेस्कॉमच्या दोषी कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई न केल्याने ग्रामस्थांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

 

Tags: