प्रेमविवाह आणि राजकीय वैमनस्यातून ग्राम पंचायत सदस्य असलेल्या एका रौडी शिटरचा निर्घृण खून केल्याची घटना हुबळी तालुक्याशल रायनाळ गावात घडली आहे.

होय, गंगीवाळ ग्राम पंचायतीचा सदस्य दीपक पठदारी याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. रायनाळ येथे भर गावात मारेकऱ्यांनी अतिशय निर्घृण पद्धतीने त्याचा खून केला आहे. प्रेमविवाह आणि राजकीय दुष्मनीतून त्याचा काटा काढण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गंगीवाळ ग्राम पंचायतीचा सदस्य असलेला दीपक पठदारी हा जुनी हुबळी पोलिसांच्या यादीतील कुख्यात रौडी शिटर होता. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल होते. डीसीपी साहिल बागला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मारेकऱ्यांचा शोधासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. या प्रकरणी जुनी हुबळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून दहाहून अधिकजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


Recent Comments