Belagavi

बेळगावात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

Share

बेळगाव शहर परिसरात आज सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावत शहरवासीयांना चिंब केले.

होय, बेळगाव शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसरात आज मंगळवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. कालपासून शहर व परिसरात तसेच बेळगाव तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशीही पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावत नागरिकांना चिंब भिजवून सोडले. त्यामुळे रेनकोट छत्र्या घेऊनच लोक कामधंद्यासाठी बाहेर पडले. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही रेनकोट छत्र्या घेत शाळा-कॉलेज गाठले. पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून बाजारपेठेतील गर्दी ओसरल्याचे चित्र होते.

 

Tags: