राज्यातील एक मोठे शहर असलेल्या बेळगावची परिस्थिती अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बिकट झाली आहे की, लोकांना स्मशानात लाईट्सअभावी मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
होय, बेळगावच्या सदाशिव नगरातील लिंगायत आणि गणाचारी स्मशानभूमीत दिवे नाहीत. त्यामुळे सायंकाळनंतर अंत्यविधी करताना लोकांना अंधारात चाचपडावे लागत आहे. दिवसभर नैसर्गिक उजेडामुळे अंत्यविधीला अडचण येत नाही. मात्र सायंकाळनंतर दिवे नसल्याने अंधारात नागरिकांची गैरसोय होत आहे. काल, सोमवारीही अशीच घटना घडली. लाईट्स नसल्याने नागरिकांना एका व्यक्तीच्या मृतदेहावर मोबाईलचे टॉर्च लावून त्या प्रकाशात अंत्यसंस्कार उरकावे लागले.
सदाशिवनगर स्मशानभूमीत अनेक गैरसोयी आहेत. त्याबद्दल कळवून देखील स्थानिक आमदार, नगरसेवक आणि पालिका अधिकारी डोळे मिटून गप्प बसलेत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे बेळगाव स्मार्टसिटी असल्याचा डंका पिटण्यात येतो अन दुसरीकडे साधे स्मशानात लाईसची सोय करता येत नाही, ही कसली स्मार्टसिटी असा संतप्त सवाल नागरिकांतून करण्यात येतोय.


Recent Comments