बेळगाव तालुक्यातील अतिवाड व बेक्कीनकेरे गावामध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगल अंगडी यांच्या हस्ते जल जीवन मिशन योजनेच्या कामाची सुरवात करण्यात आली. तसेच अतिवाड येथे 5 लाख रुपये व्यायामशाळेसाठी मंगल अंगडी यांनी आपल्या निधीतून मंजुर केले आहेत. त्याचे भूमिपूजन ही यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 2024 पर्यंत देशातील प्रतेक कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर मिळावे, तसेच जल जिवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रतेक घराला पिण्याचे शुद्ध पाणी नळाद्वारे मिळावे यासाठी या योजना अंमलात आणल्या आहेत. त्यांचा उपयोग जनतेने करून घ्यावा.
खा. मंगल अंगडी म्हणाल्या, अशुद्ध पाण्यामुळे अनेक रोग मनुष्याला होतात म्हणुन शुद्ध पाणी प्रत्येक कुटुंबाला मिळावे यासाठी ही योजना अमलात आणली आहे, दोन्ही गावांना निधी कमी पडल्यास आणखी मंजूर करून देऊ, पण काम व्यवस्थित व्हावे याची ठेकेदाराने काळजी घ्यावी. यावेळी गोपाळ कामेवाडी, रवींद्र पाटील, सोमनाथ हेब्बाळकर, ग्राम पंचायत सदस्य मलाप्पा पाटील, आनंद पाटील, विद्या पाटील, जानबा मन्नूरकर, येतेश हेबाळकर, भरमा व्हारकेरी, छब्बूबाई कांबळे, बाबू कांबळे, उमेश पाटील, गंगुबाई गावडे, भावकू सावंत, राजू सावंत, बळवंत भोगण, अर्जुन डोंबले, यलापा गावडे, सुरेश सावंत, खाचू सावंत, ठेकेदार शिवाजी चलवेटकर आदी उपस्थित होते.


Recent Comments