Athani

अथणी माध्यमिक शिक्षक संघाची अविरोध निवड

Share

केवळ शिक्षकच नव्हे तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन अशी ग्वाही राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्षपदी अविरोध निवड झालेल्या टी. एस. बागेन्नावर यांनी सांगितले.

अथणीत झालेल्या कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघाच्या अथणी तालुका शाखेच्या 2022-27 च्या 11 पदाधिकाऱ्यांची अविरोध निवड करण्यात आली. त्यानिमित्त केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.  यावेळी बोलताना नूतन संचालक चंद्रशेखर गस्ती यांनी शिक्षक संघ पदाधिकाऱ्यांच्या अविरोध निवडीसाठी सहकार्य दिलेल्या सर्व शिक्षकांचे आभार मानले.

यावेळी शिक्षक संघ अध्यक्ष म्हणून टी. एस. बागेन्नावर, संचालकपदी चंद्रशेखर गस्ती, विश्वनाथ सूर्यवंशी, एम. ए. तुगशेट्टी, नागप्पा उगार, सुरेश अथणी, शिल्पा बाळीगिडद, एस. जी. सलगरे, व्ही. बी. मेत्री, ए. एच. मुल्ला, एन. एम. सवळभावीमठ यांची निवड करण्यात आली.

त्यानंतर रामप्पा दरीगौडर, मुख्याध्यापक संघेचे अध्यक्ष एस. एम. राठोड, श्रीशैल जंबगी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुरेश चिकटटी, जे. आय. पाटील, सुनील दादागोळ , ज्योतिबा पवार, सी. एम. कांबळे, एम. एम. मिरजे आदी उपस्थित होते.

 

Tags: