मोटरसायकल चोरून अथणी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या चोरट्यांना बेड्या ठोकण्यात अथणी पोलिसांना यश आले आहे.

होय, अथणी तालुक्यात सुमारे ६ मोटरसायकली चोरून उच्छाद घालणाऱ्या तिघा चोरट्यांच्या अथणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आनंद गुळगावी, पवन गायकवाड आणि विक्रम साळुंके अशी अटक केलेल्या बाईक चोरट्यांनी नवे आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही 20 वर्षांचे आणि बरमखोडी या एकाच गावचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून चोरलेल्या 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

एसपी लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त एसपी महानिंग नंदगावी, डीवायएसपी व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली अथणी सीपीआय शंकरगौडा बसनगौडा, पीएसआय कुमार हाडकार, पोलीस कर्मचारी व्ही. जी. आरेर, बी. जे. तळवार, ए. एस. इरकल, जी. एसचं. होनवाड, जमीर डांगे, के. बी. सिरगुर, आर. सी. हादीमनी, एम. एम. खोत आदींनी या कारवाईत भाग घेतला.


Recent Comments