बेळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने आता वेग घेतला आहे. त्यामुळे नदी नाल्यांची पातळी वाढू लागली आहे. यातच गोकाक येथील जगप्रसिद्ध धबधबा आता फेसाळत्या दुधाळ लाटांसह कोसळण्यास सुरवात झालीय.

होय, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे गोकाक शहरापासून १० किमी अंतरावर असणारा प्रसिद्ध गोकाक फॉल्स धबधबा पांढऱ्या शुभ्र दुधाळ लाटांनी कोसळू लागला आहे. निसर्गाचा हा आविष्कार अगदी नयनरम्य असाच आहे. दोन्ही डोळ्यात साठवून घ्यावे असे रमणीय दृश्य येथे पहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आता येथे वळू लागली आहेत.


Recent Comments