वचन पितामह म्हणून ओळखले जाणारे विचारवंत फ. गु. हलकट्टी यांची जयंती आज बेळगावात उत्साहात साजरी करण्यात आली.

होय, बाराव्या शतकातील बसवादी शरणांची वचने, त्यांचे साहित्य जिवंत ठेवण्याचे महान कार्य फकीरप्पा गुरुबसप्पा हलकट्टी यांनी केले. संपूर्ण कर्नाटकात वचन पितामह अशी ख्याती मिळवलेल्या फ. गु. हलकट्टी यांचा जन्म 2 जुलै 1880 रोजी झाला. त्यामुळे 2 जुलै या दिवशी राज्य सरकारकडून त्यांची जयंती साजरी करण्यात येते. बेळगावातही आज जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, कन्नड व संस्कृती खाते यांच्या सहयोगाने हलकट्टी यांच्या जयंतीनिमित्त अशोक सर्कल येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
आ. अनिल बेनके, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते हलकट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सजवलेल्या रथामध्ये फ. गु. हलकट्टी यांचे भव्य छायाचित्र ठेवण्यात आले होते. जागतिक लिंगायत महासभेच्या महिला सदस्यांनी डोक्यावर वचनग्रंथ ठेवून या मिरवणुकीत भाग घेतला. झांजपथक, ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यवृंदाचा मिरवणुकीत सहभाग होता.
अशोक चौकातून काढलेली ही मिरवणूक आरटीओ संगोळ्ळी रायण्णा चौक मार्गे बसवराज कट्टीमनी सभागृहाजवळ समाप्त झाली. यावेळी लिंगायत नेते बसवराज रोट्टी, शंकर गुडस, अशोक भेंडिगेरी, अशोक मळगली, ए. आय. इटगी, शिवानंद जाफरवाडी, एस. जी. सिदनाळ, सुजाता मत्तिकट्टी, अन्नपूर्णा मळगली, महादेवी अरळी, ज्योती बदामी, भारती कर्लिंगन्नावर आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments