रायबाग विधानसभा क्षेत्रातील चिक्कोडी तालुक्यातील विजयनगर नाल्याला पूल वजा बंधारा बांधण्यासाठी १.८० कोटी रुपये अनुदान मंजूर झाल्याचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी सांगितले.

विजयनगर नाल्यावर पूलवजा बंधारा बांधण्याच्या कामाला चालना देऊन ते बोलत होते. लघु पाटबंधारे खात्यातर्फे हे अनुदान मंजूर झाले आहे. या नाल्याला पाणी साठल्याने शेतकऱ्याना मदत होईल असे ते म्हणाले.
यावेळी सुरेश बेल्लद, शिवलिंग हंजी, राजेश शिरगुर, बसलिंग काडेशगोळ, महेश पाटील, महांतेश शिरगुर, बिराप्पा पुजेरी, सदाशिव शिरगुर, अप्पासाहेब शिरगुर, सिद्राम नसलापुरे, सत्यगौडा पाटील, बंगारप्पा पुजेरी, शिवराय सनदी, सदाशिव घोरपडे व इतर उपस्थित होते.


Recent Comments