बेळगावातील मजगाव येथील युवकाच्या उद्यमबाग येथे झालेल्या खूनप्रकरणी ४ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे.
उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनच दिवसांपूर्वी मजगाव आंबेडकर गल्लीतील रहिवासी यल्लेश शिवाजी कोलकार या २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून उद्यमबाग पोलिसांनी वेगाने खुनाचा तपास सुरु केला होता.
या खुनाचा छडा पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून यलेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. आरोपींच्या चौकशीनंतर यातील सत्य बाहेर येणार आहे. यल्लेशच्या खुनात त्याच्या मित्रांचाच सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Recent Comments