विविध ठिकाणी चोरलेल्या मोटरसायकली विक्रीसाठी आणताना संकेश्वर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या.

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी, हुक्केरी, संकेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गोकाकच्या डीवायएसपीनी नाराजी व्यक्त करत या तिन्ही पोलीस स्थानकांच्या सीपीआयना धारेवर धरले होते. त्यामुळे संकेश्वर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु ठेवला होता. सीपीआय प्रल्हाद चन्नगिरी स्वतः रात्रीची गस्त घालून दुचाकी चोरट्याना बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. या चोरटयांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.
हुक्केरी तालुक्यातील बेनकनहोळी गावचे संजू मेकली, भरमा नाईक, गंगाधर मुत्यानट्टी अशी अटक केलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीच्या ६ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
संकेश्वरचे पीएसआय गणपती कोगनोळी, पोलीस कर्मचारी बी. बी. हुलकुंद, भीमाप्पा नागनुरी, महेश करगुप्पी, बी. जे. करीगार आदींनी या कारवाईत भाग घेतला.


Recent Comments