Belagavi

बेळगावात बागायत खात्याच्या रोपबाजारचे आयोजन 

Share

बागायत खात्यातर्फे आयोजित रोपबाजार आणि वनीकरण कार्यक्रमाला बेळगाव उत्तरेस . अनिल बेनके यांनी आज चालना दिली.

होय, बेळगावातील क्लब रोडवरील ह्यूम पार्कमधील बागायत खात्याच्या कार्यालयात बागायत खाते, जिल्हा पंचायत आणि जिल्हा बागायत संघाच्या वतीने आयोजित फळे-फुलांच्या रोपांचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आ. अनिल बेनके यांनी आज, शुक्रवारी रोपे वाटप करून उदघाटन केले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, बेळगावात बागायत खात्यातर्फे फळे-फुलांच्या रोपांचे प्रदर्शन आणि विक्री मेळावा आयोजित केला आहे हा चांगला उपक्रम आहे. संपूर्ण जिल्ह्यात फळझाडांची सर्वाधिक लागवड करण्याचा आमचा हेतू आहे. फळझाडांमुळे पक्ष्यांचा संचार वाढतो. ३ दिवस चालणाऱ्या या मेळाव्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, ३ दिवस चालणाऱ्या या रोपबाजारात विविध प्रकारची फळझाडे, खत विक्रीस ठेवले आहे. ही रोपे आणि खत चांगल्या गुणवत्तेची आहेत. अत्यंत कमी दरात फळझाडे उपलब्ध आहेत. ह्यूम पार्कमध्ये फुले आणि फळझाडांच्या संवर्धनाचे प्रशिक्षण देणारे एक कायमस्वरूपी केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड म्हणाले, जिल्ह्यातील विविध तालुक्यात आमच्या खात्यातर्फे 28 फार्म्स स्थापन केले आहेत. त्यापैकी 9 ठिकाणी फळे, फुले, औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. त्या-त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी ही रोपे उपलब्ध करून दिल्यास बेळगाव शहर आणि परिसरातील जनतेची सोय होणार असल्याने या ठिकाणी रोपबाजारचे आयोजन केले आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुरगोड यांनी केले. बाईट

यावेळी बागायत खात्याचे सहसंचालक सोमशेखर हुल्लोळी, जिल्हा बागायत संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव व्ही. एच. लेंगडे आदी उपस्थित होते.

 

Tags: