Belagavi

उचगावमध्ये ५६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या : 56-year-old man commits suicide in Uchgaon

Share

बेळगाव तालुक्यातील उचगावमध्ये ५६ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली. श्रीकांत जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, भावांनी केलेल्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप श्रीकांत यांच्या मुलाने केला आहे

उचगाव येथील श्रीकांत जाधव यांनी आज गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात त्यांचा मुलगा संतोष श्रीकांत जाधव यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी भावांनी केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. संतोष म्हणाले, ४ वर्षांपूर्वी सर्वे क्रमांक ६४७ येथील जमीन सुधीर गड्डे या बिल्डरने २८ लाखाला घेतली होती. मधुकर अप्पाजी जाधव यांनी आमचे वडील आणि आजोबांना फसवले होते. बिल्डर सुधीर गड्डे यांच्या विरोधात केसही केली होती. पंचांना बोलावून कॉम्प्रमाईज केले. डीसीची केस मागे घ्यायला सांगितले. सबरजिस्टरमध्ये नकली पेपर तयार करून घेतले होते आणि ६ लाखांचा चेक दिला होता. सर्वे क्रमांक ५४७ मधील १ एकर ६ गुंठे जमीनही घेतली आहे. अभिजित मधुकर जाधव, शशिकांत मधुकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य भारता मधुकर जाधव यांनी पंचानाही अडवले. खोटी तक्रार देऊन छळ केला होता असा आरोप त्यांनी केला.

Tags: