Belagavi

बेळगावात घराच्या गॅलरीला फास घेऊन वृद्धाची आत्महत्या

Share

घराच्या गॅलरीला गळफास घेऊन वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना बेळगावातील साई कॉलनीत घडली.

होय, बेळगावातील एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कंग्राळी बुद्रुकजवळील साई कॉलनीत एका वृद्धाने घराच्या गॅलरीला गळफास घेऊन वृद्धाने आत्महत्या केली. शिवाजी बिर्जे असे या वृद्धाचे नाव आहे. सकाळी-सकाळीच घरासमोरच वृद्धाचा मृतदेह लटकल्याचे पाहून परिसरातील नागरिकांना धक्का बसला. बिर्जे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह गॅलरीतून उतरवून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला. एपीएमसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Tags: