Vijayapura

नरभक्षक मगरीच्या हल्ल्यात एकाचा बळी: Man dies in crocodile attack

Share

नरभक्षक मगरीच्या हल्ल्यात एकाचा बळी गेला. अंगावर शहारे आणणारी ही घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील हंडरगल्ल गावाजवळील कृष्णा नदीत घडली आहे.  

हंडरगल्ल गावातील नागप्पा संजीवप्पा उंडी वय 55 असे मगरीचे भक्ष्य ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शोधण्यास प्रारंभ केला आहे. मुद्देबिहाळ पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Tags: