Nippani

उदयपूर हत्येचा निपाणीत निषेध

Share

राजस्थानच्या उदयपुर येथे मुस्लिम जिहादींनी कन्हैयालाल नावाच्या एका हिंदू शिंपी (टेलर) व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केली आहे. कपडे शिलाईचे निमित्त करून त्याच्या दुकानात जाऊन धारदार शस्त्राने गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ निपाणी येथे आज हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली.

यावेळी विरूपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश प पू प्राणलिंग स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदुत्ववादी संघटना व मावळा ग्रुपच्या वतीने निपाणीतील धर्मवीर संभाजीराजे चौकात ही निदर्शने करण्यात आली.

यावेळी हत्या करणाऱ्या आरोपींना तत्काळ जाहीर फाशी द्यावी, आणी कन्हैयालाल त्यांच्या घरच्यांना 20 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच हिंदूंच्या हत्या थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, देशातील अशा आसुरी प्रवृत्तीच्या जिहादींना शोधून कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली. त्याच बरोबर आरोपीच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. यावेळी निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Tags: