लोकांना धमकावून गुंडगिरी करणाऱ्या बेळगाव परिसरातील 26 गुंडांच्या घरांवर बुधवारी सकाळी–सकाळी डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखालील तब्बल दीडशे पोलिसांच्या पथकांनी छापे मारून प्राणघातक शस्त्रास्त्रे व अन्य साहित्य जप्त केले.

होय, बेळगाव शहरातील विविध भागात राहणाऱ्या गुंडांना पोलिसांनी आज सकाळी-सकाळीच चांगलाच घाम फोडला. 150 पोलिसांच्या विविध पथकांनी डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 26 गुंडांच्या घरांवर छापेमारी केली. यावेळी ३ गुंडांच्या घरातून प्राणघातक शस्त्रास्त्रे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. चाकू, कोयता, मुष्टी, जंबिया अशी हत्यारे या छाप्यात जप्त करण्यात आली. रुक्मिणीनगरातील 29 वर्षीय श्रीधर सत्याप्पा तळवार, महाद्वार रोड येथील 45 वर्षीय विनय शंकर प्रधान आणि खंजर गल्ली येथील 36 वर्षीय अल्ताफ सुबेदार यांच्यासह 26 गुंडांच्या घरांवर धाडी टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.
डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली 150 पोलिसांच्या पथकांनी आज, बुधवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई केली. फुटकळ गॅंग बनवून लोकांना धमकावत गुन्हे करणाऱ्या भुक्कड गुंडांना यातून पोलिसांनी कठोर संदेश दिला आहे.


Recent Comments