Kagawad

कुंभार गुंडय्या यांचा उगारखुर्द येथे स्मरणोत्सव

Share

कुंभार समाजाचे आराध्य दैवत कायकयोगी शिवशरण कुंभार गुंडय्या यांचा स्मरणोत्सव उगारखुर्द येथे विजापूर ज्ञानयोग आश्रमाचे अध्यक्ष बसवलिंग स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडले. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते.

बुधवारी उगार येथील श्री भक्त कुंभार फायनान्स कार्पोरेशन व कागवाड तालुका कुंभार समाज सेवा संघ, यांच्या संयुक्त आश्रय खाली शिवशरण गुंड् या यांचे दहावे स्मरणोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने आचरण्यात आले.सकाळी हजारो सौभाग्यवती एकत्रित येऊन आराध्य दैवत गुंड या यांच्या प्रतिमेची मिरवणूकी द्वारे कृष्णा नदी पर्यंत जाऊन नदीला बागिन अर्पण करून जलकुंभाचे पूजन करून भक्तीभावाने महादेव मंदिरा पर्यंत सवाद्य मिरवणूकीने येऊन स्मरण उस्तव कार्यक्रम पार पाडण्यात आले.

बसवलिंग स्वामीजी बोलताना म्हणाले कायकयोगी शिवशरण कुंभार गुंड् या यांचा जन्म पवित्र भारत देशात झाला आहे .याप्रमाणेच बुद्ध ,बसव ,भगवान महावीर सारखे अनेक शरणचा जन्म पवित्र भारत देशात झाले आहे. त्यांनी समाजाला केलेले मार्गदर्शन दिलेले उपदेश फार मोलाचे आहेत. त्याचे फार थोडे आपल्या जीवनात आचरणात आणल्यास आपले जीवन पवित्र होईल. कुंभार समाजासाठी शिवशरण गुंड या यांचे फार मोठे योगदान आहे. असे सांगून कुंभार समाजाच्या सुखदुःखात समाजप्रमुखांनी लक्ष देऊन अडचणी सोडवाव्यात तरच स्मरण उत्सव साजरा करण्याचे पुण्य प्राप्त होईल असे सांगितले.या समारंभाचे दिव्य सानिध्य तेलसंग कुंभार गुरु पिठाचे प्रमुख बसव कुंभार कुंडया महास्वामीजी, रायबाग तालुक्यातील बुदिहाळ मठाचे सचिदानंद स्वामीजी भूषवून मार्गदर्शन केले.

समारंभामध्ये कुंभार समाज एकत्रित करण्यासाठी कष्ट घेतलेले दिवंगत आप्पांना कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

समाजातील जेष्ठ मंडळी, विविध क्षेत्रांमध्ये साधना केलेले मंडळींचा सन्मान करण्यात आला.

या समाजाचे प्रमुख सुभाष कुंभार, सदाशिव कुंभार, शंकर कुंभार आनंद कुंभार ,अण्णासाहेब कुंभार, रावसाहेब कुंभार, योगेश कुंभार, दत्ता कुंभार राजकुमार कुंभार,भरतेश कुंभार कल्लाप्पा कुंभार यासह अनेक महिला सदभक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Tags: