Chikkodi

बावनसौंदत्ती येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Share

रायबाग तालुक्यातील बावनसौंदत्ती येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या बाजीराव मगदूम हायस्कूलच्या 1988-1989 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आणि गुरुवंदना कार्यक्रम ओंकार आश्रमाच्या शिवशंकर स्वामीजींच्या सानिध्यात पार पडला.    

आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थापक इरगौडा पाटील आणि शिवशंकर स्वामीजींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर बोलताना शिवशंकर स्वामीजी म्हणाले, निर्धार केल्यास माणसाला वाटेल ते साध्य करता येते. विविध क्षेत्रात नाव कमावलेल्याया माजी विध्यार्थ्यानी गुरुजनांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न म्हणून हा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे आनंद झाला आहे. बालपणातील आठवणींनाही यामुळे उजाळा मिळाला आहे असे त्यांनी सांगितले.  इरगौडा पाटील म्हणाले, गुरुवंदना आणि माजी विध्यार्थी मेळावा यासारखे कार्यक्रम आयोजित करणे सोपे नसते. ते माजी विध्यार्थ्यानी करून दाखवले ही समाधानाची बाब आहे. आमची शाळा सुरु करताना आधी खूप त्रास झाला आता संस्थेचा विकास झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची सोय झाली आहे असे ते म्हणाले. सुमारे २० वर्षांपूर्वी या शाळेत शिकलेल्या आणि आता दूरवर राहणाऱ्या अनेक विध्यार्थ्यानी या निमित्ताने एकत्र जमून बालपणीच्या आठवणी जागविल्या. यावेळी निवृत्त शिक्षक एस. ए. रूपशाळी, एस. ए. मगदूम, पी. बी. नाईक, एन. एम. पाटील, आर. एन. पाटील, एस. डी. पवार, एस. पी. पाटील, एस. आय. कोळकी, बी. टी. जनाज, अण्णासाहेब सांगले, कुमार मुंगोळी आदी यावेळी उपस्थित होते.

 

 

 

Tags: