चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून मालवाहू रिक्षा घटप्रभा नदीत कोसळल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील दड्डी येथे घडली. सुदैवानेच या घटनेत प्राणहानी झाली नाही.

दड्डी गावाहून म्हशी घेऊन महाराष्ट्रातील गावाकडे निघालेली मालवाहू रिक्षा दड्डी येथील नदीवरील पुलावरून घटप्रभा नदीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवानेच या अपघातात चालक व म्हशींना इजा झाली नाही. या पुलावर दोन्ही बाजूला संरक्षक कठडे उभारलेले नाहीत. त्यामुळेच हा अपघात झाला. यापूर्वीही या पुलावरून संरक्षक कठड्यांअभावी गायी-म्हशी तसेच वाहने नदीत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात काहींचा मृत्यूही झालेला आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कठडे उभारणीसाठी प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळेच अशा घटना घडत असल्याचे ग्रामस्थ पुंडलिक पाटील यांनी सांगितले.


Recent Comments