Kagawad

स्लग- कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या आदेशानुसार ऐनापुर शेती पाणी पुरवठा योजनेचा पूजा करून शुभारंभ करण्यात आला.-

Share

कागवाड विधानसभा मतदार संघातील आठ गावातील हजारो शेतकऱ्यांचे एकवीस हजार एकर क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे ऐनापुर पाणीपुरवठा योजनेला योजनेचे अधिकारी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करून प्रारंभ करण्यात आला.

मंगळवारी सकाळी ऐनापूर पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी प्रशांत पोतदार, बी बी गलगली, आमदार श्रीमंत पाटील यांचे आप्त साहाय्यक सचिन देसाई व शेतकऱ्यांनी कृष्णा नदीतिरावरील योजनेची पूजा करून प्रारंभ केला.

आमदार श्रीमंत पाटील यांचे आप्त सहाय्यक सचिन देसाई बोलताना म्हणाले सध्या पावसाने ओढ दिली आहे. शेतकऱ्यांचे पेरण्या झाल्या नाहीत. जनावरांना पिण्याचे पाण्याची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन आमदार श्रीमंत पाटील यांनी कामानिमित्त बेंगलोरला असतानाही तातडीने योजना प्रारंभ करावी. असा आदेश दिल्याने या योजनेची पूजा करून चालना दिल्याची माहिती सचिन देसाई यांनी दिला आहे.
ऐनापुर पाणीपुरवठा योजनेचे अभियंता प्रशांत पोतदार बोलताना म्हणाले. या योजनेच्या व्याप्तीमध्ये आठ गावांचा समावेश आहे. हजारो शेतकऱ्यांचे 21 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजनेला पूर्ण होऊन बारा वर्षे लोटली आहेत. येथील शेतकऱ्यांना योजना ही एक वरदान ठरली आहे. सतत पावसाळ्यात योजना प्रारंभ राहणार असून याचा सदुपयोग करून घ्यावा. असे शेतकऱ्यांना आवाहन केले.
मोळे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष भुताळी थरथरे यांच्या हस्ते नदीचे पूजन करून बागीन अर्पण करण्यात आले. अधिकारी सागर पवार यांनी पूजा केले.
यावेळी मोळे गावचे शेतकरी बाळू नरहरी, धर्माजी कोळेकर, गजानन मुंजे, सुरेश हुळोळी, दिलीप भरमवडेयर, मधु थरथरे, यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Tags: