नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या 513 व्या जयंती उत्सवाचे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उदघाटन केले.

होय, बेंगळूर येथे सोमवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या 513 व्या जयंती उत्सवाचे उदघाटन करून चालना दिली. केम्पेगौडा पारंपरिक स्थळ विकास निगम आणि कन्नड व संस्कृती खात्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा, इन्फोसिसचे सहसंस्थापक एस. आर. नारायणमूर्ती, प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते केम्पेगौडा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. नारायणमूर्ती यांच्यावतीने सुधा मूर्ती, पदुकोण यांच्यावतीने विपुलकुमार यांनी पुरस्कार स्वीकारले. फ्लो
या प्रसंगी डॉ. निर्मलानंद महास्वामी, नंजावधूत स्वामीजी, चंद्रशेखर स्वामीजी, मंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थ नारायण, आर अशोक, के. गोपालय्या, सुनील कुमार, मुनीरत्न, खासदार तेजस्वी सूर्या आदी उपस्थित होते.


Recent Comments