स्त्री जातीचे अर्भक काटेरी झुडुपात टाकून दिल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हलसंगी गावात उघडकीस आली आहे. सुदैवाने युवा नेत्याच्या सतर्कतेमुळे त्या निष्पाप अर्भकाचे प्राण वाचले आहेत.

होय, मुलगी झाली या कारणामुळे की काय, विजापूर जिल्ह्यातील हलसंगी गावात नवजात नकुशीला काटेरी झुडुपात निर्दयीपणे फेकून दिल्याची घटना घडली आहे. गावातील युवा नेते सिद्दराम कुट्टलगी आणि अंगणवाडी कार्यकर्तीने या बाळाला तातडीने हलसंगीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर बाळाला विजापूर जिल्हा इस्पितळात अधिक उपचारांसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे या बाळाचे प्राण वाचले. 


Recent Comments