Belagavi

वीजभारीत तारेवर पाय पडल्याने बालिकेचा मृत्यू

Share

शेतात अभ्यास करून परतताना तुटलेल्या वीजभारीत तारेवर पाय पडल्याने विजेचा धक्का लागून बालिकेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गोकाक तालुक्यातील हुलिकट्टी गावात शनिवारी सायंकाळी घडली.

हुलिकट्टी येथे चुन्नव्वा सर्वी या ८ वर्षीय बालिकेचा वीजभारीत तुटलेल्या तारेवर पाय पडल्याने विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातून ती अभ्यास करून परतताना ही चटका लावणारी घटना घडली. मरणाच्या दारात असतानाही चुन्नव्वाने अभ्यासाची पुस्तके हातात घट्ट पकडून ठेवली होती. लाडक्या लेकीच्या अशा अकाली मृत्यूने तिच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

Tags: