सैन्यदलात भरतीसाठी केंद्र सरकारने आणलेली ‘अग्निपथ‘ योजना स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केली.

हुक्केरी येथे रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक म्हणाले, संरक्षण मंत्र्यांनी अनेक चांगल्या योजना आखून त्या अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांमध्ये शिस्त आणि देशप्रेम बाणवले जाऊन भारताला बलाढ्य राष्ट्र बनवणे शक्य होणार आहे. त्यामुळे श्रीराम सेना अग्निपथ योजनेचं स्वागत करते असे मुतालिक यांनी सांगितले.


Recent Comments